MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA। – 2024 “मुख्यमंत्री – माजी लाडकी बहीण योजना”
MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये एनीमिया चे प्रमाण 50 पेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 49.5 टक्के व स्त्रियांची टक्केवारी 28.75 टक्के इतकी आहे। ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे।
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA” “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरु करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावात दिनांक २८.०६.२०२४ रोजीच्या मा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाइट- मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना (maharashtra.gov.in)
MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA। – 2024 “मुख्यमंत्री – माजी लाडकी बहीण योजना” पात्रता :-
- महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- पात्रता वय आहे 21 ते 65 वर्षे अपात्रता साठ वर्षांपेक्षा जास्त वयाची महिला असणार आहे
- त्यासाठी वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असणे गरजेचा आहे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तुम्हाला या योजनेचे लाभ मिळू शकणार आहे.
- सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता अणि निराधार महिलांसाठी ही विशेष योजना आहे. The MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA – 2024 is a special scheme for married, widowed, abandoned, and destitute women in the state.
योजना | मुख्यमंत्री – माजी लाडकी बहीण योजना |
योजना कधी सुरू झाली | १ जुलै २०२४ |
योजना कोणासाठी आहे | २१ ते ६५ वर्षे सर्व महिला |
योजनेमध्ये किती पैसे मिळणार | १५०० रुपये प्रती महिना |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३१ अगस्त २०२४ |
MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA। – 2024 “मुख्यमंत्री – माजी लाडकी बहीण योजना” अपात्रता :-
- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
- कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत किंवा पेन्शन धारक असेल तर मात्र ती व्यक्ती अपात्र असेल
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा सेवा निवृत्ती निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्राद्वारे कार्यरत असलेले त्याचा स्वयंसेवी कामगार किंवा कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
- सदर लाभार्थी महिलेचे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात आलेल्या आर्थिक योजनांद्वारे रुपये १५००/-पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
- यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ कॉर्पोरेशन बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/ उपाध्यक्ष /संचालक / सदस्य आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्यांच्याकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.
MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA। – 2024 “मुख्यमंत्री – माजी लाडकी बहीण योजना” कागदपत्रे :-
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अर्जदाराचे हमिपत्र
- उत्पन्नाचा दाखला(२.५० लाख पेक्षा कमी उत्पन्न / किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र / किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड / किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला.
- महिलेचा जन्म महाराष्ट्र बाहेर झाला असेल तर पतीचे पुढील पैकी कागदपत्रे जोडावे आदिवासी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला / किंवा जन्म दाखला पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड / किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
Win 11 Professional Activation Licence Product Key – Lifetime Single PC – 32/64 Bit
MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA। – 2024 “मुख्यमंत्री – माजी लाडकी बहीण योजना” अर्ज कसा करवा ते पुढीलप्रमाणे :-
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने करू शकतो.
MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA अर्ज कसा करावा ते पाहू- अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
- पहिल्या सेक्शन मध्ये अर्जदार महिलेचे संपूर्ण नाव जर महिला अविवाहित असेल तर सध्याचे संपूर्ण नाव महिलेचे लग्न झाले असेल तर लग्नाआधीचे संपूर्ण नाव आणि त्याखाली लग्नानंतरच्या संपूर्ण नाव.
- जन्म तारीख – दिनाक / महिना / वर्ष
- अर्ज्दाराचा सम्पूर्ण पत्ता – महिलेचा सध्याचा रहिवासी पत्ता अणि कोणत्या क्षेत्रात येत आहे उदा. ग्रामपंचायत /नगरपंचायत नगरपालिका / किंवा महानगरपालिका व पिन कोड.
- जन्माचे ठिकान – ज्या गाव किंवा शहरात महिलेचा जन्म झाला आहे ते लिहावा – तालुका – जिल्हा – राज्य.
- महिलेचा मोबाइल क्रमांक
- आधार क्रमांक.
- महिलेचा जन्म पर राज्यात झाला असल्यास पतीचे जन्म ठिकाण गा- तालुका – जिल्हा – राज्य लिहावे.
- जर महिला लाडकी बहीण योजना व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत असेल तर येथे होय किंवा नाही सिलेक्ट करून दरम्या किती लांब येतो ते लिहावे.
- वैवाहिक स्थिती लिहावी.
- अर्जदार महिलेचे बँक खात्याच्या तपशील येथे द्यावा
- बँकेचे पूर्ण नाव
- बँक खाते धारकाचे त्याचे नाव
- बँक खाते क्रमांक
- बँकेचा आयएफएससी कोड
- आधार क्रमांक बँक खातेला जोडलेला आहे का नहीं ते लिहावे.
- अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती-
१.सामान्य महिला २.अंगणवाडी सेविका ३.अंगणवाडी मदतनीस ४.पर्यवेक्षिका 5.ग्रामसेवक ६.वार्ड अधिकारी ७.सेतू सुविधा केंद्र
१३. अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावी.
१. आधार कार्ड
२. अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला*
(आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे पंधरा वर्षांपूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३.जन्म प्रमाणपत्र
४.शाळा सोडल्याचा दाखला)
३.उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केसरी राशन कार्ड*
४. अर्जदाराचे हमीपत्र
५. बँक पासबुक
६.अर्जदाराचा फोटो
७.महिलेचा जन्म पर राज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र १५ वर्षांपूर्वीचे १.रेशन कार्ड २.मतदान ओळखपत्र ३.जन्म
प्रमाणपत्र ४.शाळा सोडल्याचा दाखला.
*अर्ज पूर्णपणे भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करवा
MUKHYAMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA आपण आता ऑनलाइन सुद्धा फॉर्म भरू शकता- ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
- वेबसाईट वरती आल्यानंतर अर्जदार लोगिन याच्यावरती क्लिक करायचे.
- अर्जदार लोगिन वरती क्लिक केल्यानंतरअकाउंट तयार करायचे आहे त्या ठिकाणी खाते नाही- खाते तयार करा यावरती क्लिक करायचे.
- आधार कार्ड प्रमाणे नाव टाकायचे.
- त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- त्यानंतर पासवर्ड बनवायचा आहे.
- त्यानंतर जिल्हा निवडायचं.
- तालुका निवडायचा.
- गाव निवडायचे.
- महानगरपालिका नगरपालिका किंवा ग्रामपंचायत आहे ते सिलेक्ट करायचे ग्रामपंचायत जर असेल तर लागू नाही असे सिलेक्ट करायचे.
- Authorized Person सामान्य महिला select करायचे.
- टर्म्स अँड कंडिशन्स एक्सेप्ट करायचे आहे आणि कॅपच्या एंटर करून साईनअप बटनावर क्लिक करायचे.
- साईनअप बटनावरती क्लिक केल्यानंतर ओटीपी येईल ओटीपी टाकून परत कॅपच्या एंटर करून वेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायचे.
- परत अर्ज लोगिन वरती यायचं मोबाईल नंबर टाकायचा पासवर्ड टाकायचा कॅपच्या टाकायचा आणि लॉगिन वरती क्लिक करायचे.
- लॉग इन केल्यानंतर होम पेज वरती आल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज याच्यावरती क्लिक करायचे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आधार नंबर टाकायचा आहे सेंड ओटीपी वरती क्लिक करायचे.
- ओटीपी आपल्या मोबाईल नंबर वरती येईल मग तो ओटीपी एंटर केल्यानंतर व्हेरिफाय ओटीपी करायचे
- पूर्ण माहिती आपल्या अर्जावरती येईल.
- आपली माहिती चेक करायची
- अर्जदाराचे नाव
- वडील किंवा पतीचे नाव
- लग्न पूर्वीचे नाव
- वैवाहिक स्थिती
- जन्म दिनांक
- आपला महाराष्ट्रात जन्म झाला आहे का ते सिलेक्ट करायचे
- आधार कार्ड नुसार आपली माहिती पूर्ण येते फक्त ती चेक करून घ्यायची आहे
- त्यानंतर जिल्हा
- तालुका
- गाव
- महानगरपालिका/ नगरपालिका
- मोबाईल नंबर
- शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेतात का ते सिलेक्ट करायचे
- अर्जदाराच्या बँक खात्याची माहिती- बँकेचे पूर्ण नाव – बँक खातेदाराचे नाव- बँक खाते क्रमांक- बँक खाते क्रमांक ची पुष्टी करण्यासाठी परत टाकायचा नंतर – आयएफएससी कोड
- त्यानंतर आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का जर आपले बँक खाते जोडले नसेल तर आजारशी जोडून घ्यावे लागेल
- कोण कोणते कागदपत्र अपलोड करायचे त्याची जास्तीत जास्त साइज पाच एमबी पर्यंत असावी
अधिवास प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / पंधरा वर्षे पूर्वीचे रेशन कार्ड / 15 वर्षे पूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक
- तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे राशन कार्ड आहे का
- अर्जदाराचा फोटो आणि
- हमीपत्र
- हमीपत्रचा याच्यावरती क्लिक करायचे आणि सबमिट करायचे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपण जी माहिती भरली आहे ती व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायची आहे आणि कॅपच्या टाकून सबमिट करायचे आह
सूर्योदय योजनेसाठी येथे क्लिक करावी
Pingback: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना - Sarkari Yojana